रेग्युलेटिंग ॲक्ट 1773
1) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 कोणी संमत केला होता?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773), हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या, प्रामुख्याने बंगालमधील, भारतीय प्रदेशांच्या नियमनासाठी ब्रिटिश संसदेने संमत केलेला कायदा होता.
2) ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील प्रादेशिक कारभारात ब्रिटीश सरकारने सर्वप्रथम हस्तक्षेप कोणत्या कायद्याद्वारे केला होता?
➜ ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील प्रादेशिक कारभारात ब्रिटिश सरकारने रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 संमत करुन पहिला हस्तक्षेप केला होता.
3) ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या 1773 च्या रेग्युलेटिंग ॲक्टचा मुख्य उद्देश काय होता?
➜ ब्रिटिश सरकारच्या कायदेमंडळाने ईस्ट इंडिया कंपनीच्या विविध व्यवसायांच्या कामकाजाचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी 'रेग्युलेटिंग ॲक्ट' नावाचा कायदा संमत केला. या कायद्याचा उद्देश भारतातील (बंगालमधील) ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारात आमूलाग्र बदल घडवणे हा होता.
4) ब्रिटीश सरकारने 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट संमत करण्यामागील पार्श्वभूमी काय होती?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 हा भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे गैरव्यवस्थापन आणि आर्थिक संकटाला प्रतिसाद म्हणून, सुशासन आणि प्रशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला परंतु हा कायदा कंपनीच्या कारभाराबद्दलच्या चिंतांवर दीर्घकालीन उपाय म्हणून सिद्ध झाला नाही. त्यामुळे, नंतर अधिक मूलगामी सुधारणा म्हणून ईस्ट इंडिया कंपनी कायदा 1784 लागू करण्यात आला.
5) 1773 च्या रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे बंगालच्या गव्हर्नरचे पद बदलून त्या जागी कोणत्या नवीन पदाची निर्मिती केली गेली?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773) या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरचे पद बदलून 'गव्हर्नर-जनरल ऑफ बंगाल' असे करण्यात आले.
6) कोणत्या कायद्यानुसार वॉरेन हेस्टिंग्स हे भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल बनले?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773), या कायद्यानुसार वॉरेन हेस्टिंग्स हे भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल बनले.
7) गव्हर्नर-जनरलना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी किती सदस्यांची एक कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773) नुसार गव्हर्नर-जनरलना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी चार सदस्यांची एक कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली
8) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार कोणत्या प्रांतांचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर-जनरलच्या नियंत्रणाखाली आणले गेले?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773) नुसार बॉम्बे (मुंबई) आणि मद्रास (चेन्नई) या प्रांतांचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर-जनरलच्या नियंत्रणाखाली आणले गेले
9) भारतामध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली होती?
➜ भारतामध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना रेग्युलेटिंग ॲक्ट, 1773 या कायद्यानुसार करण्यात आली होती?
10) भारतामध्ये सर्वोच्च न्यायायालयाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली?
➜ भारतामध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना रेग्युलेटिंग ॲक्ट, 1773 या कायद्यानुसार सन 1774 मध्ये करण्यात आली.
11) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सन 1774 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सन 1774 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता (फोर्ट विल्यम) या ठिकाणी करण्यात आली?
12) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सन 1774 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता (फोर्ट विल्यम) या ठिकाणी करण्यात आली त्यातील न्यायाधीशांची संख्या किती होती?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सन 1774 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता (फोर्ट विल्यम) या ठिकाणी करण्यात आली त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि तीन इतर न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली.
13) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सन 1774 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, त्यातील पहिले सरन्यायाधीश कोण होते?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सन 1774 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, त्यातील पहिले सरन्यायाधीश सर एलिजा इम्पे होते.
14) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी कोणते उपाय करण्यात आले?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यास आणि स्थानिकांकडून भेटी किंवा लाच स्वीकारण्यास सक्त मनाई करण्यात आली.
15) रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार ब्रिटीश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीवर संसदेचे नियंत्रण कशा प्रकारे लादण्यात आले?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार ब्रिटीश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना (Court of Directors) भारतातील महसूल, नागरी आणि लष्करी बाबींचा अहवाल ब्रिटिश सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले.
16) रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773), या कायद्यानुसार भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल कोण बनले?
➜ रेग्युलेटिंग ॲक्ट, (1773), या कायद्यानुसार वॉरेन हेस्टिंग्स हे भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल बनले.
17) ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 चे मुख्य उद्देश कोणते होते?
➜
ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 चे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे होते.
18) ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये कोणत्या त्रुटी होत्या?
➜
ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये खालीलप्रमाणे त्रुटी होत्या.
19) ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये असलेले दोष दूर करण्यासाठी कोणते कायदे संमत केले?
➜ ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी नंतर ॲक्ट ऑफ सेटलमेंट १७८१ आणि पिट्स इंडिया ॲक्ट १७८४ संमत करण्यात आले.